चोरांचे वास्तव्य होते म्हणून श्री. चौरेश्वर : खंबाळे औंध येथील श्री.
चौरेश्वर (महादेव) मंदिर
|
चौरेश्वर महादेव मंदिरातील पुरातन पिंड |
कडेगांव –
कराड रोड NH-166 E लगत, कडेगांव-शिवाजीनगर एम.आय.डी.सी. शेजारी खंबाळे औंध
हद्दीतील डोंगर माथ्यावर असणारे श्री. चौरेश्वर (महादेव) मंदिर हे पुरातन असून
श्रद्धेचे स्थान आहे. हे ठिकाण श्री. चौरेश्वर मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे.
डोंगर माथ्यावरील पठारावर, निर्जन जागेत पूर्वी चोऱ्या करणारे लोक लपून बसायचे.
चोरून आणलेला ऐवज याठिकाणी वाटून घेतला जायचा. डोंगरावर तसेच निर्जनस्थळ असल्याने
कोणीही येत-जात न्हवते त्यामुळे चोरांचे वास्तव वाढले आणि येथील श्री, महादेव
मंदिराला चौरेश्वर हे नाव पडले.
अंदाजे ७०० फुट उंचीवर बारमाही पाणी असणारी वैशिष्ठपूर्ण विहीर.
|
अंदाजे ७०० फुट उंचीवर डोंगरमाथ्यावर बारमाही पाणी असणारी वैशिष्ठपूर्ण विहीर |
नेर्ली
येथील कै. शंकर लोखंडे हे याठिकाणी जनावरे चरण्यासाठी जात होते. त्यावेळी पठारावर
त्यांना महादेवाची पिंड सापडली. त्या पिंडीची दररोज पूजा कै. शंकर लोखंडे हे
नेर्ली येथून पाणी व सर्व साहित्य नेऊन करू लागले. अश्यावेळी नेर्ली येथून पाणी
घेऊन जाणे व डोंगर चढणे अवघड होऊ लागलेने त्यांनी पिंडीसमोर पाण्याची उपलब्धता
करण्याची विनंती केली. कै. शंकर लोखंडे यांच्या गुरु कै. अंबूताई कुलकर्णी यांनी
लोखंडे यांना डोंगरावर विहीर पाडा कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होईल असे सांगितले. मग
|
१९७२ साली विहीर खुदाई करतेवेळीचा फोटो |
लोखंडे यांनी भिक्षा मागून तसेच काही देणगी घेऊन, स्वः खर्चाने १९७२ साली
दुष्काळात विहीर खोदकामास सुरवात केली. कै. शंकर लोखंडे यांची अतूट श्रद्धा
असल्याने अनेक आर्थिक अडचणींना तोंड देऊन, पर्यायी गावोगावी फिरून पिक्चर(सिनेमा)
दाखविण्याचे काम केले.
|
विहिरीची खुदाई करताना नागरिक |
त्यातून येणाऱ्या रकमेतून त्यांनी विहीर खुदाईचे काम पूर्ण
केले. या विहिरीस पाणी लागले. वैशिष्ठपूर्ण बाब म्हणजे हे ठिकाण डोंगरमाथ्यावर
जमिनीपासून अंदाजे ७०० फुट उंच आहे.
आसपास कोणतेही पाण्याचे स्त्रोत नसताना एवढ्या
उंचीवर बारमाही पाणी उपलब्ध असते. या विहिरीचे पाणी केंव्हाच आटत नाही.
मंदिराचा जीर्णोधार :
|
जुने मंदिर बांधकाम सुरवातीच्या वेळी पूजा करताना कै. शंकर लोखंडे |
मौजे खंबाळे औंध येथील ग्रामस्थ तसेच आसपासच्या गावातील नागरिकांच्या
सहकार्याने छोटेसे मंदिर बांधले आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यात व सोमवारी भाविक
दर्शन घेण्यासाठी येतात. खंबाळे येथील ग्रामस्थ श्रावणातील शेवटच्या सोमवारी
भंडारा आयोजन करून अन्नदान करतात.
विकासापासून वंचित :
|
मंदिर व विहिरीचा जुना फोटो |
सदर श्री.
चौरेश्वर मंदिर हे जमिनीपासून अंदाजे ७०० फुटपेक्षा जास्त उंचीवर डोंगरमाथ्यावर स्थित आहे. यावरून श्री.
डोंगराई मंदिर, कडेपूर, श्री. चौरंगीनाथ मंदिर, सोनसळ, श्री. अष्टदेवी मंदिर कडेगांव,
टेंभू योजनेचे मोठे कॅनॉल, तलाव व आसपासचा नयनरम्य परिसर पाहता येतो. परंतु अजून
हे ठिकाण विकासापासून वंचित असून याठिकाणी रस्ता व पायाभूत सुविधांची कमतरता आहे. शासन
आणि प्रशासन या दोन्ही यंत्रणांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे ठिकाण विकासापासून वंचित
राहिले आहे. या ठिकाणी सोयी-सुविधा निर्माण केल्यास निसर्गरम्य असे उत्कृष्ठ पर्यटनस्थ
विकसित होऊन रोजगार निर्मिती होईल.
|
मंदिर डोंगरमाथ्यावरून दिसणारा नयनरम्य परिसर |
पर्यावरण संवर्धनाची गरज :
या महादेव
मंदिर डोंगररांगेत अनेक झाडांच्या कतली झाल्या आहेत. तसेच उन्हाळ्यात याठिकाणचा
पाला-पाचोळा व गवत पेटवल्यामुळे संपूर्ण परिसर राख होतो. पूर्वी येथे ससे, खोकड,
हरीण असे प्राणी होते. परंतु आता सापडत नाहीत. डोंगराच्या पायथ्याला कडेगांव नगरपंचायतीने
कचऱ्याचे ढीग उभे केले आहेत. डोंगर माथ्यावर थंडगार व स्वच्छ हवा आणि मनमोहक परिसर
असल्यामुळे नागरिक येतात. परंतु आता अस्वच्छतेचे जाळे पसरले आहे. कडेगांव तालुक्यातील
वनविभागाने संपूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे या परिसरात पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. चौरेश्वर
मंदिर परिसर हा संपूर्ण शांत व निसर्गरम्य आहे. नैसर्गिक वातावरणाची, पक्षांच्या
आवाजाची आणि वाऱ्याच्या गतीची अनुभूती या ठिकाणी अनुभवता येते. त्याचबरोबर
श्रद्धास्थानी मंदिर असल्यामुळे मन प्रफुल्लीत होऊन आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे
एकवेळ अवश्य भेट द्या. श्री. चौरेश्वर (महादेव) मंदिर खंबाळे औंध, (कडेगांव-शिवाजीनगर
एम.आय.डी.सी. शेजारी, खंबाळे औंध, ता. कडेगांव)
माहिती : श्री. जयकर लोखंडे (नेर्ली)
श्री. विक्रमसिंह भोसले (खंबाळे औंध)
श्री. स्वप्नील जंगम (नेर्ली)
- संकलन - श्री. प्रमोद महादेव
मांडवे
(संस्थापक/ अध्यक्ष : शिवशक्ती सोशल फौंडेशन)
|
चौरेश्वर महादेव मंदिर परिसर |
|
कै. शंकर लोखंडे हे पूजा करतानाचा फोटो. |
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
|
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
|
|
|
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
|
|
|
For More Information Click Here |
|
Comments
Post a Comment
Comment and share this article.