#प्रमोदभाऊ
✌✌✌ शेर चले बजार
कुत्ते भोंके हजार ✌✌✌
जंगलाचा राजा सिंह ज्यावेळी जंगलातून फेरफटका मारत असतो. त्यावेळी हजारो कुत्री भुंकून त्या सिंहाला आम्ही हजारो आहोत आणि तू एकटा असे सांगण्याचा आणि भीती दाखविण्याचा निष्फळ आणि केविलवाणा प्रयत्न करतात. पण त्यात ते कधीच यशस्वी होत नाहीत. कारण सिंह आणि कुत्र्याची तुलनाचं होऊ शकत नाही. विशेष म्हणजे सिंह देखील अश्या भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष देत नाही. कारण त्याला माहिती आहे. प्रत्त्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला त्याची जागा दाखवून द्यायची म्हंटल तर आपल्या धेयस्थानी योग्य वेळी आपण पोहचू शकत नाही. आणि असंही भुंकून-भुंकून आणि ओरडून या जंगलाचा राजा सिंह जंगलात फेरफटका मारत असल्याची माहिती ते सगळ्या प्राण्यांना देतात. त्यामुळे सिंहाला कोणताही अडथळा होत नाही. आणि सिंह आरामपणे आपला प्रवास पूर्ण करू शकतो.
#प्रमोदभाऊ #शेर चले बजार कुत्ते भोंके हजार
असाच एक मनुष्यरूपी सिंह मा. प्रमोदभाऊ
सर्वसामान्यांच्या हिताचे सामाजिक कार्य निस्वार्थी भावाने अविरतपणे करत आहेत.
गोरगरीब, वंचित आणि मागास लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी धडपडत आहेत.
शिवशक्तीच्या माध्यमातून बहुजनांना एकत्र करून जाती-धर्म-वर्ण-लिंगभेद या अनिष्ठ
प्रवृतींची सामाजिक प्रबोधनातून शिकार करीत आहेत.
मा. प्रमोदभाऊ मांडवे शेतकर्यांना मार्गदर्शन करताना.
समाजात, ग्रामीण भागात फिरून
लोकांना सामाजिक समस्या, लाभाच्या व आर्थिक उन्नतीच्या योजनांचा प्रसार करून
नागरिकांचे आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न करत
आहेत. समता, बंधुता, एकता व शांतता हे गुण जनमानसात रुजविण्यासाठी प्रमोदभाऊ विविध
उपक्रम आयोजित करत आहेत.
प्रमोदभाऊंची समाजशील विचारसरणी व समाजाप्रती असणारी आपुलकी.
परंतु काही मनुष्यरूपी स्वार्थी कुत्र्यांची यामुळे
बेचैनी झाली आहे. तू एकटा आहेस आणि आम्ही हजारो असे दाखवून माघारी फिर, सामाजिक
कामे सोडून दे, आमच्या शरण ये अशी चेतावणी देत आहेत. आणि उठसूट प्रमोदभाऊंच्यावर निर्लज्जपणाच्या पुढे जाऊन आरोप करीत आहेत. या भुंकणाऱ्या कुत्र्यांना
भुंकण्यासाठी काही राजकीय गिधाडं रसद पुरवीत आहेत. त्याचबरोबर काही प्रशासकीय
कोल्हीसुद्धा एकवटली आहेत.
जब तक जेल में चना रहेगा, आणा जाना चला रहेगा
आणि सगळी मिळून प्रमोदभाऊ या सिंहाला बदनाम करून
संपविण्याचा डाव आखत आहेत. उद्देश एकचं प्रमोदभाऊंच सामाजिक काम थांबवायचं आणि गोरगरीब
जनतेला आपल्या दावणीला बांधून त्यांना गुलाम करायचं. नवीन नेतृत्व तयार झालं की
आपलं अस्तित्व धोक्यात येईल हे ओळखून ही मंडळी कटकारस्थान करण्यात व्यस्त आहेत.
#प्रमोदभाऊ #शेर चले बजार कुत्ते भोंके हजार
प्रमोदभाऊंची समाजशील विचारसरणी व समाजाप्रती असणारी आपुलकी.
जब तक जेल में चना रहेगा, आणा जाना चला रहेगा
पण प्रमोदभाऊ हे सिंह आहेत. शेर चले
बाजार कुत्ते भोंके हजार । प्रमोदभाऊ या भेकडांना कधी भीक घालत नाहीत. आणि भीती तर
त्यांच्या स्वभावातच नाही. वास्तविक प्रमोदभाऊ आणि या हजारो कुत्री, कोल्ही आणि
गिधाडांची तुलनाच होऊ शकत नाही. प्रमोदभाऊ तो दानविर कर्णरुपी युवा चेहरा आहे
ज्याने आयुष्याचा उपभोग घ्यायचा सोडून, भरपूर पगाराची चांगली नोकरी आणि सुखद
आयुष्य सोडून समाजाच्या भल्यासाठी आपला खिसा दररोज रिकामा केला आहे आणि आजही करत
आहे. तुमच्याकडे समुद्र आहे आणि तुम्ही त्यातले तांब्याभर पाणी देताय म्हणजे
दानशूरपणा नाही, तर स्वतः तहानेने व्याकुळ झाले असताना स्वतःच्या पोटातले उरले
सुरले जिवंत राहण्यासाठी लागणारे पाणी काढून इतरांना वाटणे. म्हणजे दानवीरपणा.
विद्यार्थ्यांना वही व शालेय साहित्य वाटप करताना मा. प्रमोदभाऊ .
असे
सामाजाच्या सेवेत स्वतःचे आयुष्य खर्च करणारे प्रमोदभाऊ कुठं आणि स्वार्थी, लाचार
राजकीय कुत्री, कोल्ही आणि गिधाडं कुठं.
प्रमोदभाऊंच्या बदनामीसाठी कटकारस्थान
रचली जातात. खोट्या विनयभंग, मारहाणीच्या केसेस, शासकीय कामात अडथळा आणल्याचे खोटे
आरोप करून प्रमोदभाऊ व्हिलन आहेत असे भासविण्याचा प्रयत्न होतोय.
विद्यार्थ्यांना वही व शालेय साहित्य वाटप करताना मा. प्रमोदभाऊ .
प्रमोदभाऊंना बदनाम करण्यासाठी विनयभंगाचे कट-कारस्थान |
गोबेल्स नीती वापरून प्रमोदभाऊंची प्रतिमा काहीही करून मलीन करण्याचे षडयंत्र रचलं जातंय. काहीही करा आणि प्रमोदभाऊंना त्रास द्या. असले उद्योग करणारी हजारो कुत्र्यांची टोळी कार्यरत आहे. कारण कायतर प्रमोदभाऊ पुढे जातायतं. आणि जनतेची साथ त्यांना आहे. याचा प्रमोदभाऊंना कधीच राग येत नाही किंवा ते लक्षसुद्धा देत नाहीत कारण ते स्वामीजींचे विचार मानतात.
आणि स्वामी विवेकानंद म्हणतात, जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे. तेवढीच जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधक यांची गरज आहे. स्पर्धक आपल्याला सतत गतिशील आणि क्रियाशील बनवतात. विरोधक कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवितात. आणि हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतात. या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट लागत नाही. ते फुकटात मिळतात. त्यांच्यावर चिडू नका कायम त्यांचे स्वागत करा. कारण त्यांच्याशिवाय तुमचे जगणे अधुरे आहे. अश्या बदनामी करणाऱ्या आणि मागे बोलणाऱ्या विघ्नसंतोषी लोकांच्यावर प्रमोदभाऊ कधीही चिडत नाहीत. याउलट त्यांचे स्वागत करतात. विघ्नसंतोषी आणि नामर्दानी प्रमोदभाऊ शरण येत नाहीत म्हंटल्यावर खोटी विनयभंगाची, मारहाणीचा तक्रार करून कायदेशीर भानगडीत अडकविण्याचा प्रयत्न केला.
खोटा गुन्हा दाखल करून प्रमोदभाऊंना बदनाम करण्याचे षड्यंत्र |
प्रशासनाने शासकीय कामात अडथळा आणल्याचा खोटा आरोप करून शासकीय शास्तीची भीती दाखवून प्रमोदभाऊंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. " कर नाहीतर डर " कशाला असे म्हणून प्रमोदभाऊ त्यांच्याकडे दुर्लक्ष करून समाजासाठी पुढे मार्गक्रमण करीत आहेत. प्रमोदभाऊ म्हणतात, खोट्या केसेसची अनमोल आभूषणे प्रशासनाने राजकीय दबावापोटी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला न मागता भेट दिली आहेत. याबद्दल मी प्रशासनाचा आणि खोटी केस करावी म्हणून परावृत्त करणाऱ्या राजसत्तेचा शतशः आभारी आहे. माझ्या प्रगतीसाठी आणि प्रसिद्धीसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व प्रशासन, राजकीय नेतेमंडळींचा मी मनापासुन ऋणी आहे. आपल्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्या व्यक्तीचा कधीही द्वेष न करता प्रमोदभाऊ जनतेच्या सेवेत मग्न आहेत.
प्रमोद भाऊंच्यावरील खोटा विनयभंगाचा खोटा गुन्हा मागे घ्या : शिवशक्तीची मागणी |
त्यांनी कधीही सर्वसामान्य लोकांची
साथ सोडली नाही. हाच सर्वसमावेशक, प्रेमळ स्वभाव प्रमोदभाऊंना महान बनवतो. आज
प्रमोदभाऊ सर्वसामान्य, गोरगरीब लोकांच्या हक्कांसाठी स्वतःच्या चांगल्या
आयुष्याचा, संसाराचा त्याग करून प्रस्थापित आणि प्रशासकीय अश्या दोन्ही हुकूमशाही
व्यवस्थेच्या विरोधात लढत आहेत. प्रमोदभाऊंचे लोकहितार्थ काम थांबावे. सामाजिक
समता-बंधुता मोडून आपली पोळी भाजावी यासाठी अनेक कोल्ही, कुत्री, गिधाडं कार्यरत
आहेत. सतत भुंकून-भुंकून लोकांना, जनसामान्यांना विचलित करीत आहेत. पण हा जंगलाचा
राजा सिंहासारखा निर्भय गडी प्रमोदभाऊ आपल्या रुबाबात समाजाच्या विकासासाठी
अहोरात्र प्रयत्न करीत आहे, समाजासाठी भांडत आहे. सामाजिक न्यायासाठी भल्याभल्यांशी लढत आहे. म्हणूनच शेर चले बाजार कुत्ते भोंके हजार I
ही उक्ती प्रमोदभाऊंच्या कर्तुत्वाला समांतर आहे.
माझ्या प्रगतीसाठी आणि प्रसिद्धीसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व प्रस्थापित आणि प्रशासकीय हुकूमशीचा शतशः आभारी आहे. आपल्या कृपेने खोट्या गुन्ह्यात मोफत जेल पर्यटन करायला मिळाले. पुनःश्च आभार !
जय हिंद
! जय भारत ! जय शिवशक्ती !
मा. श्रीकांत महाडिक (सचिव : शिवशक्ती सोशल फौंडेशन )
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
|
|
|
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा. |
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा. |
All the best ur Brite future 💐💐💐💐
ReplyDeleteThanks from Pramod Mandave
ReplyDelete