बदनामीचे षडयंत्र : चारित्र्यवान, सुसंस्कृत शिवशक्तीचे शिलेदार

बदनामीचे षडयंत्र : चारित्र्यवान, सुसंस्कृत शिवशक्तीचे शिलेदार

       मी नुकताच पुण्याहून गावाकडे आलो. माझ्या कामाच्या निमित्ताने मी कृषी कार्यालयात गेलो होतो.माझी आणि प्रमोद मांडवे यांची ओळख कृषी कार्यालयात झाली. तिथे माझ्या कामाला प्रमोद मांडवे यांची मदत झाली. प्रथमदर्शनी प्रमोद मांडवे हे एक साधारण व्यक्तिमत्व असेच वाटले. साधी प्रकृती आणि मनमिळाऊ स्वभाव. त्यानंतर शिवाजीनगर गावात येता जाता भेट होऊ लागली. आणि मी त्यांच्या शिवशक्ती फाउंडेशनचे कार्य जाणून घेतले. मला हे कार्य बघुन आश्चर्य वाटले मी शहरी भागात नोकरी केली. तेथील अनेक संस्थांची कामे पहिली. पण कडेगाव तालुक्यासारख्या ग्रामीण भागात एवढे मोठे काम तेही कुणाच्याही आर्थिक मदतीशिवाय स्वहिसा खर्चून करण्याचे धाडस एक तर खूप पैसे असणार माणूस ज्याला पैशाची काहीच किंमत नाही असा. किंवा युगपुरुष, त्यागी मनुष्य त्याच्यापुढे पैसे हे फक्त गरज, मिथ्या आहे असाच करू शकतो.
      प्रमोद मांडवे यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम पण तरीही समाजाबद्दल एवढी तळमळ की दुसऱ्याचे दुःख निवारणासाठी स्वतःच्या अंगावरील कपडेच काय पण स्वतःला पण विकतील. ज्याप्रमाणे गौतम बुद्धांनी एका भुकेल्या वाघाची भूक भागवण्यासाठी स्वतःची मांडी वाघाच्या तोंडात दिली. त्याचप्रमाणे प्रमोद भाऊ दररोज गोर-गरिबांची भूक भागवण्यासाठी स्वतःचे आर्थिक नुकसान करून सेवा करत होते. यावर त्यांना मी वारंवार प्रश्न विचारले की ते मला स्वामी विवेकानंद यांची आठवण करून देतात आणि जीवांची सेवा हीच ईश्वरसेवा असल्याचा दाखला देतात. पण हे एवढं करण कोणीही फक्त एकट्याच्या जीवावर कुटुंब आणि मित्रपरिवार यांच्याशिवाय करू शकत नाही. त्यांच्या या कार्याला त्यांच्या भावाची मोलाची साथ आहे.
     गणेश हा प्रमोद भाऊंचा छोटा भाऊ दिसायला धिप्पाड पण हळवा आणि विनम्र, प्रेमळ. गावातील वयाने छोट्या मुलाला पण विनम्र भाषेत हाक मारणार. शरीरयष्टी अशी की दोन चार जणांना सहज लोळवेल. रानात काम करून मजबूत शरीरयष्टी झाली होती. पण कधीच त्याचा गर्व नाही. अतिशय संस्कारी आदर्श मुलगा आणि उत्तम व्यवसायिक. शिवशक्ती फाउंडेशनच्या खजिनदार पदाची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्याचबरोबर शिवशक्ती कृषी अवजारे बँक यांच्या व्यवस्थापणाची जबाबदारीही त्याच्यावर आहे. त्याच्या व्यवसाय कौशल्याच्या जोरावर शिवशक्ती शेतकरी स्वयंसहायता गटाने अकरा लाख रुपयांचे भांडवल वाढविले आहे. गणेश यासोबत स्वतःचा छोटासा हॉटेल व्यवसाय व शेती बघतो. त्याची दिनचर्या सकाळी पाच ते संध्याकाळी दहा पर्यंत फक्त एकच ' काम हीच पूजा ' प्रमोद भाऊ आणि गणेश दोघे स्वामी विवेकानंद यांचे निस्सीम भक्त. आपण शिवशक्तीच्या कार्यालयात गेला की आपणस दिसून येईल की सर्व ठिकाणी स्वामी विवेकानंद आणि त्यांचे विचार असेच फोटो दिसतील. यावर प्रमोद भाऊंना मी एकवेळ विचारले. स्वामीजींचे फोटोच का? यावर प्रमोद भाऊंचे उत्तर होते. समाजसेवा हाच माझा धर्म आहे.आणि माझ्या धर्माचे रक्षण करताना माझे विचार शुद्ध असले पाहिजेत. त्यासाठी मी हे विचार मनात ठासून भरलेत. यावर मी त्यांना सहजच विचारले स्वामीजी तर सन्यासी होते. मग तुम्ही पण सन्यास घेताय काय. प्रमोद भाऊ म्हणाले, नात आणि कर्म हे वासनेवर नाही तर स्वच्छ भावनेवर निर्माण होत. असेच आदर्श विचार गणेशने पण मनात खोलवर बिंबविले आहेत.
      एक दिवस आम्ही कार्यालयात मिटींगसाठी बसलो होतो. आणि सहजच सर्वजण गप्पा मारत एकमेकांची थट्टा करत होतो. कोणीतरी गणेशला म्हणाले, गणेशभाऊ सगळ्यात हँडसम आहेत. गणेशभाऊंच्या मागे मुलींची रांगच उभा राहील. गणेशने विनम्रपणे उत्तर दिलं. माझ्यामाग स्वतःला समाजसेवेत झोकून देणाऱ्या तरुणांची रांग उभा राहिली तर मला अधिक आनंद होईल. असे दोघे भाऊ आणि त्यांचे खंबीर मित्रमंडळी श्रीकांत महाडिक, अमोल मांडवे व आणखी खूपजण. पण सर्वात एक गोष्ट समांतर होती. गुरुजन, माता-भगिनी यांचा आदर करणे राष्ट्रनिर्मितीसाठी, समाजहितासाठी स्वतःला झोकून देने आणि जात- धर्म या आचाराना थारा न देता. सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन सर्वांची प्रगती करणे. म्हणूनच शिवशक्तीचे ब्रीद वाक्य समाजसेवा हाच धर्म शिवशक्ती आणि शिवशक्तीच्या शिलेदारांना योग्य ठरते.

                                                                         श्री. संतोष वायदंडे
                                       संचालक/ शिवशक्ती, कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि.

#IsupportGm

Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Comments

Buy Now