कृषी औजारांची बँक : शिवशक्ती कृषी औजारे बँक

आआअह


शिवशक्ती कृषी औजारे बँकेतून भाडेतत्वावर सवलतीत कृषी औजारांचा पुरवठा

महाराष्ट्र शासन, कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण अभियान अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गटांना शेती औजारांची कृषी औजारे बँक स्थापन करणे व शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात शेती मशागत करून देण्याच्या उद्देशाने कृषी औजारे बँक हि योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत शिवाजीनगर ता. कडेगांव येथील शिवशक्ती शेतकरी स्वयंसहायता गटाने शिवशक्ती कृषी औजारे बँक स्थापन केली. महाराष्ट्र शासनाकडून यासाठी ४० टक्के सबसिडी मिळाली. शेतकऱ्यांना कृषी औजारे भाड्याने देऊन शेतकऱ्यांच्या मशागतीचा खर्च कमी करण्याचा यशस्वी प्रयोग कृषी विभागाने शिवशक्ती कृषी औजारे बँक या माध्यमातून शिवाजीनगर येथे राबविला आहे.
      पूर्वी शेतकरी बांधवांची शेती मशागत करताना हेळसांड व्हायची. मोठ्या शेतकऱ्यांकडे स्वतःची औजारे व यंत्रसामुग्री असते. ते स्वतःची कामे प्रथम करतात व नंतर बाहेरची कामे व्यवसायिक दराने करतात तो दर शेतकऱ्यांना परवडणारा नसतो. परंतु पर्याय नसताना शेतकऱ्यांना जास्त पैसे मोजून अशी मशागतीची कामे करून घ्यावी लागतात. यावर उपाय म्हणून शेतकरी बांधवांना एकत्र येऊन शिवशक्ती शेतकरी स्वयंसहाय्यता गटाची स्थापना केली व गटाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या सहाय्याने शिवशक्ती कृषी औजारे बँक उभारण्यात आली.
      कडेगांव तालुक्यात प्रामुख्याने उस हे मुख्य पिक असून उसाच्या मशागतीचा खर्च इतर पिकांच्या तुलनेत जास्त होतो. म्हणून शिवशक्ती कृषी औजारे बँकेतून नांगरणी, कुळवणी, सरी सोडणे, खोडकी काढणे, रोटरी करणे आदी कामे औजारांच्या सहाय्याने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात करून दिली जात आहेत. त्याचबरोबर उस शेतीमध्ये शेवटचा टप्पा म्हणजे उस गळीतास पाठविणे असतो. अश्यावेळी वाहतूक व्यवस्था समस्या व चिखल आदींमध्ये वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडकल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. या परीस्थित खाजगी ट्रॅक्टरला ओढणी कामांसाठी विनंती करावी लागते. औजारे बँकेच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून कमी दरात अशी वाहतूक व ओढणी करून दिली जात असल्याने शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
      सध्यस्थितीला शिवशक्ती कृषी औजारे बँकेत महिंद्र अर्जुन नोव्हो ६०५ डीआय ट्रॅक्टर, दोन फाळी नांगर, ५ फुटी व ६ फुटी रोटाव्हेटर, ९ दाती कल्टीव्हेटर व सरी रेजर अशी रुपये १० लक्ष किमतीची यंत्रसामुग्री व औजारे बँक आहे. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कृषी औजारे उपलब्ध करून देणेसाठी शिवशक्ती शेतकरी गट व तालुका कृषी विभाग विविध जाहिरात माध्यमांचा वापर करून या प्रयोगाला सामाजिक-वाणिज्यिक जोड देत आहे.
      शिवशक्ती शेतकरी गट व औजारे बँकेच्या माध्यमातून मशागतीबरोबर गट सदस्यांना आर्थिक नफा डिव्हीडंट स्वरूपात मिळाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनमान सुधारले आहे. तसेच शेतकरी सदस्यांना छोट्या-छोट्या गरजांसाठी कर्ज उपलब्ध करून दिल्याने गट सदस्यांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यास मदत झाली आहे. शिवशक्ती शेतकरी गट कृषी विभागाच्या सर्व योजना अतिउत्साहाने शिवाजीनगर गावात राबवीत आहे. यामध्ये खते, औषधे बी-बियाणे वाटप, कृषी मार्गदर्शन शिबिरे व शेती सहल आयोजन यामुळे शेतकरी सक्षम होण्यास मदत मिळाली आहे. शासकीय सबसिडी व सवलतीमुळे शेतकरी व शेतकरी गटालासुद्धा आर्थिक लाभ झाला आहे. सध्यस्थितीत बचत गट आर्थिक सक्षम असून रु. ११ लाखाची स्थावर मालमत्ता गटाकडे आहे. रु. ५ लाखांच्यावर आर्थिक व्यवहार आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शिवशक्ती कृषी औजारे बँक व शेतकरी बचत गटांचा प्रयोग यशस्वी झाला आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
ü गटाच्या भविष्यकालीन योजना

·      उस तोडणी यंत्र, जेसीबी मशीन अश्या मोठी अद्यावत यंत्रे औजारे बँकेत सामील करून त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना सवलतीत शेतीसुविधा पुरविणे.
·         छोट्या व मध्यम स्वरूपात उस प्रक्रिया उद्योग उभारणे.
·         अद्यावत शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारणे.
·         हमीभावयुक्त शेतीमाल खरेदी-विक्री केंद्र उभारणे.
·         शेतीपूरक उद्योग व्यवस्था, शेतकरी बाजार उभारणे.

        मी माझ्या शेतात मागील वर्षापासून शेतीची मशागत जसे नांगरणी, सरी सोडणे, कुळवणे, रोटरी करणे अशी सर्व कामे शिवशक्ती कृषी औजारे बँकेच्या माध्यमातून सवलतीत व योग्य वेळेत करीत आहे.
             -    श्री. संजय रावसो पवार
     (प्रगतशील शेतकरी, शिवाजीनगर)


            सामुहिक शेती, कृषी यांत्रिकीकरण व विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आर्थिक सक्षम व्हावे. शिवशक्ती औजारे बँक प्रमाणे जिल्ह्यात शेतकरी बचत गट चळवळ सक्षम करून प्रगतशील सामुहिक शेती निर्माण करून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान सुधारणेसाठी प्रयत्न करणार आहे.
                                                                                             -    श्री. राजेंद्र साबळे
                                                                                           (जिल्हा कृषी अधीक्षक)


            शिवशक्ती कृषी औजारे बँक प्रगतीपथावर असून शेतकऱ्यांना नावे अद्यावत यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या सहाय्याने क्रेडीट तत्वावर मशागत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. उत्पादनवाढ व शेतकरी सक्षमीकरणासाठी सामुहिक शेती, प्रक्रिया उद्योग शिवशक्ती शेतकरी गटाच्या माध्यमातून निर्माण करणार आहे.
-    श्री. प्रमोद महादेव मांडवे
                                                                    ( अध्यक्ष, शिवशक्ती शेतकरी स्वयंसहाय्यता गट, शिवाजीनगर ) 

 

सदस्य संख्या – ११ शेतकरी

आर्थिक उलाढाल – ५ लक्ष रुपये

मागील वर्षाचा आर्थिक नफा – रु. ७०६३१ रुपये

स्थावर भांडवल – रु. ११ लक्ष रुपये








Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Comments

Buy Now