बदनामीचे षडयंत्र : ढग येतील ढग जातील, आकाश पुन्हा साफ होईल.


मा. प्रमोद मांडवे उर्फ भाऊसाहेब 

संस्थापक/ अध्यक्ष शिवशक्ती समूह 


बदनामीचे षडयंत्र : ढग येतील ढग जातील, आकाश पुन्हा साफ होईल.

        ज्यावेळी आपण आपल्या ऐन तारुण्याच्या काळात मौजमजा करण्यात व्यस्त असतो. त्यावेळी स्वतःला मिशी देखील फुटली नसताना कुटुंबाचा, स्वतःचा विचार न करता समाजहितासाठी वयाच्या विसाव्या वर्षी समाजसेवा हाच धर्म मानून स्वतःच्या महत्वाकांक्षा दाबून समाजसेवेच्या यज्ञात स्वतःला झोकून दिलेले नेतृत्व म्हणजे प्रमोद मांडवे. वयाच्या विसाव्या वर्षांपासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा, गोर गरीब जनतेच्या रक्षणासाठी राजकीय वर्चस्वाला भिडणारा आणि त्याला वारंवार आव्हान देणार हा युवा समाजसेवक आजच्या तरुण पिढीला सतत प्रेरणा देत राहिला आहे. 

     तथापि बदल घडविणाऱ्या दुरदृष्ट्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्याचे प्रयत्न काही मूठभर लोक करत आहेत. राजकीय स्वार्थ ठेऊन पहिल्यांदा गणेश मांडवे आणि आता प्रमोद मांडवे यांच्यावर निर्लजपणाच्या पण पुढे जाऊन विनयभंगाचे आरोप केले जात आहेत. हे सर्व गणेश मांडवे यांना झालेल्या मारहाणीच्या आरोपातून मुक्तता व्हावी या हेतुने आरोपी व्यक्तीने स्वतःच्या घरातील महिलेची लज्जा स्वतःच चव्हाट्यावर आणून हे बदनामीचे षडयंत्र आखले गेले आहे. पण विशेष म्हणजे सत्याचे पाठीराखे यामध्ये स्वतः मुक्याची भूमिका घेतात त्यावेळी आश्चर्य वाटते. राजकीय दबावाला बळी पडून स्वतःचा आणि फक्त स्वतःच्या कुटुंबाचाच विचार करणाऱ्या आणि राजकीय स्वार्थाला बळी पडणाऱ्या जनतेतील मात्तबर व्यक्तींकडून सत्य रक्षणासाठी पुढे येण्याची अपेक्षा सत्यरक्षकांनी यापुढे करू नये. एखादी बाजारबसवी स्त्रीदेखील आपली बेअब्रू आपल्या तोंडाने कबूल करीत नाही, झाकून ठेवते. जी स्त्री निष्कारण आपली बेअब्रू आपल्या तोंडाने खोटे बोलून दाखविते आणि फक्त स्वतःच्या प्रियजनांना वाचविण्यासाठी दुसऱ्याला कलंकित करते आणि ते करण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या लोक आणि ते कृत्य करणाऱ्यांचा धिक्कार असो.
        शिवशक्ती समूहाचे अध्यक्ष नीतिमान समाजसेवक प्रमोद मांडवे यांना बदनाम करणारे बाजारबसवे अश्याच गटारीतल्या “बावनखणीत” जन्माला आल्यासारखे वागणारच. तथापि त्यांच्या विकृतिपूर्ण कृत्याला हे सडेतोड उत्तर देत आहे.
        प्रमोद मांडवे यांच्यासारखे शेकडो युवक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची कास धरून आज तळागाळातुन कार्य करीत आहेत. जाती-धर्म भेद मुजवून बहुजनाना प्रबोधन करीत आहे. हिटलर आणि हुकूमशाही विचार लाथाडून स्वामी विवेकानंदांचे विचार अंगीकारत आहे. एकंदरीत उद्याच्या सांस्कृतिक संघर्षासाठी आताची पिढी आज विचारसज्ज होत आहे. हे सुचिन्ह आहे. प्रमोद मांडवे यांनी याविषयी टोकाची भूमिका न घेता आपल्यावर होणाऱ्या आरोपांना कायदेशीररित्या उत्तर देण्याचे ठरविले आहे. खोटे आरोप झाले तरी ते सहन करून लढण्याची तयारी स्वच्छ चारित्र्याचा व्यक्तीच दाखवू शकतो. ही धमक प्रमोद मांडवे यांच्यात आहे. म्हणूनच ढग येतील ढग जातील, आकाश पुन्हा साफ होईल. 
               क्रमशः

#ISupportGm


Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Comments

Buy Now