लहान थोरांचा
नमस्कार हरपला
कै. बजरंग आप्पा मांडवे (नाना) ३१ मार्च १९३१ ते १६ ऑक्टोबर २०१८
वयाने आपल्यापेक्षा लहान असो वा
मोठा, पदाने उच्च असो वा निच्च, दोस्त असो वा दुश्मन सर्वांना आदराने वाकून
नमस्कार घालणारे बजरंग आप्पा मांडवे म्हणजे नाना. मांडवे कुटुंबीय हे मूळचे
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचे खानदानी फडतरे-देशमुख शिवछत्रपतीचे वतनदार, लढवय्ये
मावळे. कालांतराने विस्थापित होऊन नागांव कुमठे, तालुका खटाव आणि तदनंतर शिवाजीनगर
येथे स्थायिक झाले. सुरवातीला मंडप घालून राहत होते त्यामुळे लोक त्यांना मांडवे
नावाने हाक मारू लागले. इंग्रज सत्तेच्या आधीपासून मांडवे कुटुंबीय शिवाजीनगर येथे
वास्तव्यास आहेत. बजरंग नाना हे आप्पाजी मांडवे यांच्या पाच मुलांमध्ये तीन
नंबरचे. त्यांचा जन्म ३१ मार्च १९३१ रोजी वडील आप्पाजी आणि आई गोकुळाबाई यांच्या पोटी
झाला. सुरवातीला खडतर परिस्थितीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शाळा मास्तर या
पदी जिल्हा परिषद शाळा सातारा जिल्हा येथे नियुक्ती झाली होती. परंतु ऐन वेळेस
सांगली जिल्ह्याच्या नवनिर्मितीमुळे त्यांची निवड रद्द करण्यात आली. तदनंतर उदरनिर्वाह करणेसाठी, शेती करण्याचा मार्ग निवडला. शेती करत असताना शिवाजीनगर
गावच्या जडणघडनीमध्ये भाग घेतला आणि कौटुंबिक जबाबदारी बरोबर सामाजिक कार्यामध्ये
हात घातला. प्रत्येकाला नमस्कार घालण्याबरोबर सर्वांचे वाद सामंजस्य पद्धतीने विना
तंटा हात जोडून सोडविणे हे मोठेपण नानांच्यात होते.
१९६५ ते १९८१ या काळात शिवाजीनगर गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि
उपसरपंच असा राजकीय व्यापही नानांनी सांभाळला. स्वर्गीय संपतराव आण्णा यांच्या व
राष्ट्रवादी विचारसरणीशी अवगत होऊन नानांनी सामाजिक चळवळ शिवाजीनगर येथे उभी केली.
कौटुंबिक किंवा राजकीय वादात कधीही नानांनी सत्याची साथ सोडली नाही. याचा राजकीय
फटका त्यांना बसून सुद्धा त्यांनी समाजाला आपल्यापासून वेगळे केले नाही हा त्यांचा
समाजशील स्वभाव सर्वांनाच भावणारा होता. कोणी कितीही वाईट बोलले अथवा वाईट केले
तरी त्यांच्याशी संबंध कधीही तोडले नाहीत त्यामुळे नाना हे अजातशत्रू होते.
वयाच्या मध्यवधीत कोरडवाहू शेतीला जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने बागायती केले.
कडेगांव तालुका हा दुष्काळी पट्टा होता. पण नानांनी या दुष्काळाची झळ आपल्या शेतीला
आणि कुटुंबाला कधीही लागू दिली नाही. नाना हे आस्तिक आणि धार्मिक स्वभाव असणारे
व्यक्तिमत्व होते. त्यामुळे त्यांचा संस्कृती संवर्धनासाठी योगदान अनमोल आहे.
सुरवातीच्या काळापासून नानांचा संघर्ष आणि कार्य पाहिलेले काही लोकच गावात शिल्लक
आहेत ते नानांना आदराने आणि कृतज्ञतेणे आजही सन्मान देतात कारण त्यांचासारखा
देवमाणूस पुन्हा होणे शक्य नाही. उत्तरार्धात सुद्धा त्यांचे कार्य कधीही थांबले
नाही. एम.आय.डी. सी. मध्ये सर्वसामान्य लोकांची शेत जमीन जबरदस्तीने संपादन
करण्याचा प्रक्रियेला नानांनी आवाहन दिले. सत्तेच्या विरोधात जाऊन कायदेशीर लढाई
उच्च न्यायालयात लढली. पण काळाला नानांचा संघर्ष बघवत न्हवता की काय कोणास ठाऊक.
नानांना पायाच हर्निया तसेच मोतीबिंदूने जखडले त्यामुळे संघर्षाला तात्पुरता विराम
बसला. आजारातून सावरून नानांनी वयाच्या उत्तरार्धात धार्मिक- सामाजिक चळवळीत मन
गुंतवले आणि मोठ्या हिरिरीने गावच्या विकासासाठी पुन्हा- पुन्हा योगदान दिले.
महात्मा गांधीजींचे आम्हीच वारसदार
आहोत, असा डांगोरा पिटणारे कित्तेक लोक या जगात आहेत. पण त्यांच्या तत्वावर
चालणारे कमी आहेत. महात्मा गांधीजींचे ' अहिंसा परमोच्च धर्म ' हे तत्व नानांनी
सदैव पाळले आणि त्याचा सुयोग्य वापर गावातील वादविवाद आणि तंटा मिटविण्यासाठी
केला. वाद-विवाद हा भांडून शिवीगाळ किंवा मारहाण करून नाहीतर, फक्त हात जोडून
नमस्कार घालून मिटवता येऊ शकतो हे नानांनी सिद्ध करून दाखवले. सत्तेचा वापर करून
आणि प्रचंड भ्रष्टाचार करून पोट भरणाऱ्या नेत्यांचीही संख्या सध्या वाढतेच आहे. या
पार्श्वभूमीवर जिद्द, निर्धार, परिश्रमाच्या बळावर आपल्या शेतीला भरभराटीला आणून,
त्यात मिळालेल्या पैशाचा विनियोग समाजाच्या सेवेसाठी करणारे निस्वार्थी बजरंग
नाना, हे मात्र सर्वार्थाने महात्मा गांधीजींच्या विश्वस्ताच्या भूमिकेचे कृतिशील
वारसदार होते. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी समाजातल्या तळागाळातल्या
वंचितांच्या सुखा-समाधानाचाच विचार केला.
सामाजिक सेवेसाठी जीवन अर्पण
केलेल्या नानांनी कोणत्याही सन्मानाची अपेक्षा कधीच केली नाही. आपल्या पूर्वजांच्या
शिकवणीनुसार ते शेतीतून मिळालेला नफा दीनदुबळ्यांसाठी खर्च करीत राहिले. या दानाचा
गाजावाजा त्यांनी कधीच केला नाही. आपण समाजाकडून मिळालेल्या प्रेम रुपी संपत्तीचे
विश्वस्त आहोत, हीच नानांची भावना होती. स्वतःची भावंडे आणि त्यांची मुले
यांच्यावर पण नानांचा विशेष जीव होता. त्यामुळे त्यांनी कधीही त्यांना वेगळी
वागणूक दिली नाही. एकत्रित संसार असो किंवा भावाभावांचा वेगवेगळा संसार नाना
सर्वांच्यात मिसळून राहायचे. नातवंडे आणि परतुंडे सर्वांच्यावर नानांनी प्रेम आणि
माया लावली. सर्वांचा आनंदी संसार पाहून नानांना देवाजवळ जाण्याची ओढ लागली होती.
वयाच्या उत्तरार्धात सर्व जेष्ठ आणि समवयस्क लोकांबरोबर पेपर, पुस्तके वाचन, मंदिर
प्रदक्षिणा असा त्यांचा दिनक्रम होता. अखेरच्या काळात देव भक्तीत सतत लिन राहत
होते. देवाचे नाव वाहिमध्ये लिहत देवाजवळ जाण्याची मनोकामना करत होते. अखेर देवाने त्यांना बोलवून घेतले.ओम नमः
शिवाय, जय श्रीराम, ओम सिद्धनाथाय नमः असे असंख्य वेळा नामस्मरण करून वाहिमध्ये
लिहलेल्या कित्तेक वह्या नानांच्या पेटित आजही आहेत.
शिवशक्तीच्या स्थापनेत संस्थापक
मार्गदर्शक नाना आहेत. ही संस्था नानांचा वारसा चालवत आहे. नानांनी सुरू केलेला
समाजसेवेचा हा यत्न आता शिवशक्तीच्या शिलेदारांवर आहे. शिवशक्तीच्या माध्यमातून
समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, शांती हे गुण शिवाजीनगर गावात आणि समाजात रुजू
करण्याचे नानाचे स्वप्न शिवशक्तीच्या खांद्यावर आहे. आम्हीही ते पराकष्टाने पूर्ण
करू आणि नानांच्या जीवनातील उद्दीष्ठ तेजोमय ठेऊ हीच आज बजरंग नानांना अंतिम
श्रद्धांजली आहे.
नानांच्या या अकाली निधनाने
सर्वार्थाने माणसातला देव शोधणारा देवमाणूस हरपला आहे. अशी सर्वांची भावना आहे.
अखेर सर्वांना नमस्कार घालणारे बजरंग नांना/ बाबांचा शेवटचा नमस्कार या जगाला
लाभला आणी आमचा सर्वांचा कायमचा नमस्कार हरपला. बजरंग आप्पा मांडवे म्हणजेच नानांना शिवशक्ती समूहातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !!!!!
- संकलन : श्रीकांत मानसिंग महाडिक ( कार्याध्यक्ष,
शिवशक्ती सोशल फौंडेशन )
|
बजरंगनाना मांडवे शेतकऱ्यांना खते व औषधे वाटप करत असताना |
|
शिवशक्ती तर्फे कोळपी वाटप कार्यक्रम प्रसंगी बजरंग (नाना) आप्पा मांडवे |
|
शिवशक्ती कृषी मार्गदर्शन शिबीर प्रसंगी संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक बजरंग (नाना) आप्पा मांडवे |
|
कामधेनु दत्तक गरम योजनेतून पशुपालकांना औषधे वाटप करताना बजरंग नाना व सभापती सौ. करांडे |
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
|
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
|
|
|
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
|
|
|
For More Information Click Here |
|
Comments
Post a Comment
Comment and share this article.