मा. प्रमोद मांडवे संस्थापक/ अध्यक्ष शिवशक्ती समूह |
बदनामीचे षडयंत्र : निर्लज्जम् सदा सुखी
मा. गणेश मांडवे खजिनदार शिवशक्ती समूह |
अशी कर्तबगारी अंगी बाळगणारी निर्लज्ज, बेशरम मंडळी. पुन्हा माफी असावी या हिरोना दादा, भाऊ, डॉन असे म्हणा. नाहीतर ते तुम्हाला पण सोडणार नाहीत. अश्या व्यक्ती आपल्या भागात भरूपर आहेत. प्रामुख्याने तालुक्याच्या मुख्य ठिकाणी या मंडळींचे कळप आढळतात. झुंडशाही आणि कळपाने वावरण्यावर यांचा फार विश्वास असतो. ‘एक तीळ सात जणांनी वाटून खावा’ असे म्हटले जाते. ही मंडळी वेगळ्या अर्थाने तेच करतात. ग्रुप करणे आणि एक तरुण त्याला कळपाने मारहाण करणे. किंवा एखाद्या महिलेला समूहाने भीती दाखवणं. त्यात ती तरुणी जर बाहेरगावची असेल तर हद्दच पार केली जाते. अश्याप्रकारे हे तथाकथित डॉन तीळ नाही तीळाचे कोठारच वाटून खायचे असा यांचा कार्यक्रम असतो. ब-याचदा असे होते की, असा काही विषय निघाला, अरेरावी, दंडेली असे शब्द उफाळून वर यायला लागले की आपोआप राजकारणी मंडळी, लोकप्रतिनिधी यांची आठवण आपसूक या शब्दांबरोबरच जोडूनच येते.
अगदी ताजे उदाहरण एका गरीब कुटुंबातील स्वतः कष्ट करून जीवन जगणारे आणि अल्प उत्पन्नातून सुद्धा बहुतांशी वाटा समाजसेवेसाठी खर्च करणारे शिवशक्ती समूहाचे अध्यक्ष प्रमोद मांडवे यांचा भाऊ गणेश मांडवे याला काही भेकड, गावगुंडांनी भीती दाखविण्याच्या उद्देशाने आणि राजकीय पाठबळाने मारहाण केली. स्वाभाविक आहे मारहाण झाली आहे म्हंटल्यावर प्रमोद मांडवे यांनी आरोपींना शिक्षा देण्यासाठी कायदेशीर तक्रार केली. आणि असे गैरकृत्य करणाऱ्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि त्यांनी क्षणाचाही विचार न करता स्वतःच्या घरातील एक महिलेला ढाल बनवून विनयभंगाचा गुन्हा प्रमोद मांडवे यांच्यावर दाखल केला. जेणेकरून प्रमोद मांडवे हे बदनामी आणि सदर नकली गुन्ह्याच्या प्रकोपातून वाचण्यासाठी पहिली भावाची मारहाणीचा केस मागे घेतील. पण त्यां मूर्ख लोकांना माहिती नाही की प्रमोद मांडवे मेले तरी मागे हटणार नाहीत.
विशेष म्हणजे अश्या गांवगुंडांची वैचारिक क्षमता काय असते हे आपणा सर्वांना माहिती आहे. मग असा छळ कपट करणारी बुद्धी कुणाची बरे असेल हा प्रश्न निर्माण होतो. अश्या गलिच्छ, दादागिरी करणा-याना, समाजाला वेठीस धरणाऱ्यांना काय म्हणावे ? स्वतःला कायद्याच्या कचाट्यातून वाचविण्यासाठी स्वतःच्या घरातील महिलांची इज्जतीची पण परवा न करणे म्हणजे अर्थप्राप्तीसाठी स्वतःच्या आई-बहिणीला धंद्याला लावणारे दलाल असेच म्हणावे लागेल.‘कुणी निंदा अथवा वंदा, नालायकपणा हाच आमचा धंदा’ हे अश्या व्यक्तींचे ब्रीद आहे. अशी वृत्ती या सगळ्यांनी अंगी बाणवून घेतली आहे. त्यांच्यासमोर गांधीगिरी करा वा त्यांना गुलाब द्या, त्यांना काहीच फरक पडणार नाही. कारण यांच्यापैकी कुणालाच लाज नाही !
क्रमश:
#IsupportGm
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
|
|
|
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा. |
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा. |
Comments
Post a Comment
Comment and share this article.