युवानायक : प्रमोद उर्फ भाऊसाहेब मांडवे

मा. प्रमोद मांडवे उर्फ भाऊसाहेब संस्थापक/ अध्यक्ष शिवशक्ती समूह 

   युवानायक : प्रमोद उर्फ भाऊसाहेब मांडवे 

        " माझा निसर्गाने बनविलेल्या नियमांवर पूर्ण विश्वास आहे. निसर्गाचा सर्वात सुंदर, सोनेरी नियम सदासर्वदा देणे हाच आहे. जो समाजाला काही देऊ शकत नाही तो कधीच आनंदी राहू शकत नाही " अशी मा. प्रमोदभाऊ मांडवे यांची समाजशील विचारसरणी आहे.
          सण २०११ पासून वयाच्या २० व्या वर्षातच स्वतःला सामाजिक कार्यात वाहून समाजहितासाठी, गोर-गरीब जनतेच्या रक्षणासाठी, राजकीय वर्चस्वाला भिडणारे आणि त्याला वारंवार आव्हान देणारे युवा नेतृत्व म्हणजे प्रमोदभाऊ. वक्तृत्व, कर्तुत्व आणि नेतृत्व या त्रिगुणांचा संगम म्हणजे प्रमोदभाऊ. शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणारे प्रमोदभाऊ. समाजउपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक प्रबोधन करणारे प्रमोदभाऊ. समाज साक्षर व्हावा यासाठी प्रयत्न करणारे प्रमोदभाऊ. जेवढे बोलू तेवढे कमीच पडेल असे असंख्य पैलू असणाऱ्या या अवलिया युवा समाजसेवकाने वयाच्या २० व्या वर्षी विविध सामाजिक संस्थांची स्थापना करून आपल्या सामजिक कार्याचा शुभारंभ केला. तसे पाहिले तर मा. प्रमोद मांडवे यांचे विद्यार्थी दशेपासुन सामाजिक कार्य आणि सामाजिक चळवळींशी नाते राहीले आहे. एकीकडे चांगली नोकरी मिळत असताना ती सोडून माझ्या माणसांसाठी मला काहीतरी केले पाहिजे या जाणिवेतून नोकरीला ठोकर मारून समाजसेवा हाच धर्म आणि माणुसकी हेच कर्म हे ब्रीद ठेऊन शिवशक्ती सोशल फाउंडेशन, शिवशक्ती शेतकरी स्वयंसहाय्यता गट, शिवशक्ती पशुपालक मंडळ, शिवशक्ती, कै. अधिकभाऊ मांडवे वाचनालय, शिवशक्ती, कडेगाव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. अश्या सर्वसामान्य लोकांच्या कल्याणार्थ विविध संस्थांची उभारणी प्रमोदभाऊंनी केली. शिवशक्ती सारख्या कित्तेक संस्था आपल्याला पावलोपावली उभारलेल्या दिसतीलही, पण शिवशक्तीच्या या सर्व संस्था कोणत्याही आर्थिक पाठबळाशिवाय स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या संपूर्ण योगदानातून उभे करणे आणि त्या वाढवणे म्हणजे समुद्रातून मोती काढण्याएवढे कठीण आहे. पण कठीण, अशक्य हे शब्द प्रमोदभाऊंच्या डिक्शनरीत आढळत नाहीत. या सर्व सामाजिक- आर्थिक नवनिर्मितीत स्थापनेपासून प्रत्यक्ष कामकाज व ग्रामीण आणि सामाजिक चळवळीत कार्यकर्ता म्हणून प्रमोदभाऊ घडत राहिले. 
        सर्व भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रगुरु स्वामी विवेकानंद, क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, संविधान निर्माते डॉ. आंबेडकर, क्रांतीनायक नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक या महापुरुषांचा वैचारिक वारसा जपत ते सामाजिक चळवळींशी जोडले गेले आहेत. महादेवाच्या त्रिनेत्रातील संपूर्ण शक्ती आणि भोळेपणा शिवशक्तीत आपल्याला अनुभवता येईल. म्हणून शिवशक्तीच्या लोगोत महादेवाचे त्रिनेत्र आहे. हे सर्व बारकावे प्रमोदभाऊंच्या कल्पनेतून निर्माण झाले आहेत. यावरून या माणसाच्या निरीक्षणशक्ती आणि वैचारिक मतांचा थोडाबहुत अंदाज घेता येईल. माझा जन्म अमावस्येला झाला आहे, त्यामुळे संघर्ष हा माझ्या पाचवीलाच पुजला आहे असे प्रमोदभाऊ म्हणतात. समाजव्यवस्था आणि प्रशासन यांच्याविरोधातील प्रमोदभाऊंचा उठाव पाहिला की हे वाक्य खरे ठरते. स्वतःला मिशी देखील फुटली नसताना एम.आय.डी. सी कडेगाव साठी चुकीच्या पद्धतीने भूसंपादन केलेने प्रशासनाविरोधात आमरण उपोषण तसेच कडेगाव सेतू कार्यालयातील भ्रष्टाचारविरोधात आंदोलन किंवा पोलीस प्रशासन आणि महसूलच्या चुकीच्या कार्यपद्धतीवरील आंदोलन असा संघर्ष प्रमोदभाऊंनी सतत केला. यामध्ये समाजहितासाठी त्यांना शारीरिक तसेच मानसिक यातना सहन कराव्या लागल्या. प्रमोदभाऊंचे सामाजिक कार्य थांबावे या हेतूने राजकीय सुडातून खोटे-नाटे आरोप लावले गेले. ज्यांची प्रगती रोखता येत नाही त्यांची बदनामी केली जाते हा समाजाचा नियम सर्वज्ञात आहे. पण हा समाज हेच माझे कुटुंब आहे. ‘ समाज सर्वप्रथम ’ या तत्वाशी प्रमोदभाऊंनी कधीही तडजोड केली नाही. किंवा कोणाच्याही शरण गेले नाहीत. याउलट प्रमोदभाऊ सत्यासाठी अविरत संघर्ष करत आहेत.
           ‘ शिवशक्ती ’ या शीर्षकाखाली विविध सामाजिक संस्था प्रमोदभाऊंच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या चालू आहेत. सुमारे दहा हजार पेक्षा जास्त लाभार्थींना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचा उद्धार करण्याचे अनमोल कार्य प्रमोदभाऊंनी शिवशक्तीच्या माध्यमातून केले आहे. शिवशक्तीच्या सामाजिक कार्याशी सूमारे एक लक्ष लोक विविध माध्यमातून जोडले असून प्रमोद भाऊंच्या कार्याची महती सर्वांनाच आहे. सण २०१३ साली शिवशक्ती सोशल फौंडेशन या संस्थेची स्थापना करून प्रमोदभाऊंनी अधिकृतरीत्या आपल्या सामाजिक कार्यास सुरवात केली. गोरगरीब, वंचित, मागास लोकांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करणे आणि समाजविकास होण्याच्या हेतूने शिवशक्तीच्या सर्व संस्थांची मुख्य संस्था शिवशक्ती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून युवक विकास, क्रीडा, शिक्षण, शेती व ग्रामविकास, आरोग्य, पर्यावरण, कला व संस्कृती, महिला सक्षमीकरण या ८ क्षेत्रात उल्लेखनीय असे सामाजिक कार्य प्रमोदभाऊंनी केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याला युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या जिल्हास्तरीय " सर्वोत्कृष्ठ युवा संस्था " या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच शिवशक्ती सोशल फौंडेशनने स्वच्छता व ग्रामविकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याला सन २०१६/१७ साली " तालुका युवा मंडळ " पुरस्काराने भारत सरकार स्थापित नेहरू युवा केंद्र, सांगली यांच्यातर्फे गौरविण्यात आले आहे. 
       राष्ट्राची प्रगती करायची असेल तर युवकांना घडविले पाहिजे. यासाठी युवकांना चारित्र्य घडविणारे, मानसिक बल वाढविणारे आणि स्वावलंबी बनविणारे शिक्षण दिले पाहिजे असे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते. अगदी त्याचप्रमाणे प्रमोदभाऊंनी युवकांना विकासाचा धागा बनवून चांगले शिक्षण, पायाभूत सुविधा, सर्वोत्कृष्ठ मार्गदर्शन आणि सर्वकाही उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. आज ' युवाजागृती ' या प्रकल्पातून विद्यार्थी आणि युवकांना घडविण्याचे कार्य प्रमोदभाऊ करीत आहेत. चुलते कै. अधिकभाऊ मांडवे यांच्या नावाने वाचनालयाची स्थापना शिवाजीनगर ता. कडेगाव येथे केली आहे. वाचनसंस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने शासनाच्या कोणत्याही अनुदानाशिवाय सदर मोफत सार्वजनिक वाचनालय गेले ५ वर्षे अविरत सुरू आहे. भारतीय कला संस्कृती आणि महापुरुषांचे आचार-विचार यांचे संवर्धन आणि प्रसार होणे गरजेचे आहे आणि म्हणूनच विविध चर्चासत्रे, व्याख्याने, जयंती उत्सव आदींच्या माध्यमातून कला, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळ वाढविण्याचे कार्य शिवशक्ती करीत आहे. प्रमोदभाऊ करीत आहेत. दुष्काळ आणि पाणी व्यवस्थापन आदी समस्यांवर प्रमोदभाऊंनी स्वतः काम केले आहे. दुष्काळग्रस्त लोकांसाठी निधी असेल अथवा जनावरांना चारा प्रमोदभाऊंनी स्वतः पुढे होऊन आर्थिक-भौतिक मदत केली आहे. खानापूर तालुक्यातील सहा गावांत जलजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून जलव्यवस्थापनाचे धडे देऊन लोकांना जागृत केले. पृथ्वी ही आपली माता आहे तिच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे. आणि हीच जबाबदारी प्रमोदभाऊंनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. ' गो ग्रीन हो क्लीन ' चित्रकला स्पर्धा, ' माझा गांव स्वछ गांव अभियान ', वृक्षलागवड चळवळ आदी पर्यावरण रक्षणाचे उपक्रम शिवशक्तीच्या माध्यमातून प्रमोदभाऊंनी राबविले आहेत. ज्या लोकांना कृषी विभाग काय आहे माहिती न्हवता आणि काही विशिष्ठ राजकीय व्यक्तींनाच कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत होता अश्यावेळी प्रमोदभाऊंनी या योजना सर्वसामान्य शेतकरी लोकांना मिळवून देणेसाठी शिवशक्ती शेतकरी स्वयंसहाय्यता गटाची स्थापना केली. कृषी विभागाच्या सर्व योजना या शेतकरी गटाच्या माध्यमातून घरोघरी पोहचविण्याचे कार्य प्रमोद भाऊंनी केले. सुमारे २५ लक्ष रुपयांपेक्षा जास्त निधी सदर योजनेतून शेतकऱ्यांना मिळवून दिला आहे. १२०० पेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे कार्य प्रमोदभाऊंनी केले आहे. त्याचाबरोबर कृषी विभागाच्या सहाय्याने ' शिवशक्ती कृषी औजारे बँक ' या सवलतीत भाडेतत्वावर शेती औजारे सुविधा पुरविण्याचा प्रकल्प यशस्वीरीत्या राबविला आहे. शेतकऱ्यांना जे-जे पाहिजे ते-ते पुरविण्याचे कार्य प्रमोदभाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्तीच्या माध्यमातून होत आहे. महिलांच्या सहभागाशिवाय आपण पूर्णत्वाकडे जाऊ शकत नाही असे प्रमोदभाऊंचे मत आहे आणि म्हणूनच महिला सक्षमीकरण हा विषय घेऊन प्रमोदभाऊ कार्य करीत आहेत. महिलांना आर्थिक आणि सामाजिक सक्षम बनविणे व पुरुषांबरोबर समान दर्जा देणे हेच उद्दीष्ठ ठेऊन महिलांना प्रशिक्षित करण्याचे कार्य प्रमोदभाऊ करीत आहेत. ' प्रतिबंध हा उपयांपेक्षा केंव्हाही चांगला ' असे म्हणतात. म्हणून आरोग्य क्षेत्रातील समस्यांवर जनजागृतीचे कार्य शिवशक्तीच्या माध्यमातून होत आहे. शिवशक्ती दिनदर्शिका ही न चुकता प्रत्येक वर्षी आपल्या घरात मोफत येते. ही दिनदर्शिका छपाई आणि मोफत वितरण करण्यामागचा प्रमोदभाऊंचा हेतू एवढंच की, लोकांनी आयुष्यात वेळ काळ याला महत्व देऊन या दिनदर्शिकेचे माध्यमातून आयुष्याचे नियोजन करून यशवी व्हावे. सूक्ष्म पण प्रभावी असा उपक्रम प्रमोदभाऊंच्या संकल्पनेतून गेली ४ वर्षे राबविला जातोय. प्रत्येक वर्षी ११००० दिनदर्शिका मोफत वितरण करण्याचा विक्रम प्रमोदभाऊंनी, शिवशक्तीने केला आहे.
        ज्यावेळी प्रमोदभाऊंनी शिवशक्तीच्या स्थापना केली त्यावेळी त्यांना निंदा-नालस्तीचा सामना करावा लागला. अजूनही छळ-कपट करून प्रमोदभाऊंना त्यांच्या कार्याला बदनाम करण्याचे प्रयत्न काही मंडळी करीत आहेत. पण हार मानणारे नाव प्रमोदभाऊ होऊ शकत नाही. आणि म्हणूनच स्वतःच्या आर्थिक महत्वाकांक्षा दाबून स्वतःच्या उत्पन्नातील जवळजवळ सर्वच हिस्सा सामाजिक कामासाठी खर्च करणाऱ्या प्रमोदभाऊंना दानविर कर्ण म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. 
           आपल्या भोवतालच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक व सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे चिकित्सकपणे पाहिले नाही आणि या प्रश्नांबद्दल आपण आपल्या योगदानातून आणि कृतीतून निर्भिडपणे व्यक्त झालो नाही तर सजग नागरीक आणि मनुष्य म्हणून आपण सामाजिक दृष्ट्या मृतप्राय होऊ, महापापी होऊ अशी धारणा घेऊन प्रमोद भाऊंनी सामाजिक कार्यास सुरवात केली होती. गेल्या ५ वर्षांपासून प्रमोदभाऊंच कार्य, कामाची पध्दत प्रत्यक्ष याची देही याची डोळा मी पाहत आहे. मग हळूहळू हा माणूस मला समजायला लागला. युवक कल्याण, शिक्षण, शेती, क्रीडा, साहित्य, व्यवसाय, संघटना, चळवळी, आंदोलनं अशा विविध क्षेत्रांत युवकांची मुस आणि कूस घडविण्यात या माणसाचा वाटा सिंहाचा आहे. स्वामी विवेकानंदांचे बलशाली युवा भारत घडविण्याचे स्वप्न घेऊन हा युवानायक रात्रंदिवस धडपडत आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात १०० संकट आली तरी पुन्हा उभे राहा आणि आणखी एकदा प्रयत्न करा. हा माणूस १००० संकटे आली तरी पुन्हा उभा राहतोच यातून प्रमोदभाउंची इच्छाशक्ती आणि अटळ आत्मविश्वास दिसून येतो.
          प्रमोदभाऊंना लोक वेडा म्हणत होते पण खरी क्रांती या ध्येयवेड्या तरुणानेच केली आहे. शहाणे जेंव्हा दरवाजे बंद करून बसले होते तेव्हा हा ध्येयवेडा तरुण रात्रीच्या अंधारात समाजासाठी चालत होता. म्हणूनच प्रमोद भाऊ आणि संघर्ष हे सूत्र जुळून येते. मग तो संघर्ष प्रशासनाविरोधात असो अथवा राज्यकर्त्यांविरोधात. प्रमोदभाऊंचा संघर्ष असतो तो फक्त सर्वसामान्यांच्या हक्कासाठी. स्वातंत्र्य, समता, बंधुता व शांती हे विचार रुजविण्यासाठी. असे म्हणतात की, जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही. तेंव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही, कधीकधी एकटे पण लढावे लागते, पण असे लढा की साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील. जसे की आमचे आदर्श, शिवशक्तीचे अध्यक्ष, युवानायक, आदरणीय प्रमोद मांडवे उर्फ भाऊसाहेब. 
            जय शिवशक्ती, जय हिंद, जय भारत.... 
क्रमशः
                                                                        श्री. श्रीकांत मानसिंग महाडिक
                                                                 कार्याध्यक्ष/ शिवशक्ती सोशल फाउंडेशन
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Comments

Buy Now