वाचकांचे ज्ञानमंदिर: शिवशक्तीचे, कै. अधिकभाऊ मांडवे सार्वजनिक वाचनालय शिवाजीनगर ता. कडेगांव

वाचकांचे ज्ञानमंदिर: शिवशक्तीचे, कै. अधिकभाऊ मांडवे सार्वजनिक वाचनालय शिवाजीनगर ता. कडेगांव

             असे म्हणतात, " पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारते...अन ज्याचे मस्तक सुधारलेले असते तो उभ्या हयातीत कोणापुढे नतमस्तक होत नाही. आणि यापुढे जाऊन अध्यात्म हे साऱ्या जगताचे मूळ आहे. विज्ञान शास्त्र हे अध्यात्मावर आधारलेले आहे, ते अध्यात्माच्या पुढे जाऊ शकत नाही. अध्यात्माचा, शास्त्राचा प्रसार-प्रचार केला पाहिजे. यासाठी वाचनसंस्कृती जपली पाहिजे, वाढवली पाहिजे असे कै. अधिकभाऊ मांडवे यांचे मत होते. अधिकभाऊ हे माझे चुलते वयाने मोठे पण ते माझे खूप जवळचे मित्र, सहकारी होते. सुरवातीच्या काळात २०११/१२ साली जेंव्हा मी सामाजिक कार्याला सुरवात केली, त्यावेळी माझ्याबरोबर कोणीही न्हवते आणि कोणी यायलाही तयार न्हवते. काही जवळचे लोकसुद्धा लांबून माझी धावपळ, तडफड, व्यवस्थापन यातील त्रुटी बघून हसण्याचा आनंद घेत होते. अश्यावेळी माझ्या मदतीला माझ्या जवळचे मित्र नाही तर, माझ्यापेक्षा वयाने तिप्पट असणारे माझे चुलते पण मी त्यांना मित्र मानतो असे अधिकभाऊ भक्कमपणे उभे राहत होते.                     
           ज्यावेळी आपल्याला सामजिक कार्यक्रम घ्यायचा असतो, म्हणजे व्याख्यान, सभा किंवा संमेलन वगैरे अश्यावेळी मंडपव्यवस्था, चहापान, ऑडिओ-सिस्टीम, बैठक व्यवस्था असे सर्व बघावे लागते. हे सर्व मॅनेज होईलही पण चांगल्या उपक्रमासाठी माणसे, प्रेषक जमा करणे हे खूप कठीण काम असते. आणि माझे वय त्यावेळी जेमतेम २० वर्षे होते मग माझ्या निमंत्रणाला कमीच किंमत मिळायची. अश्यावेळी अधिकभाऊ देवदूतप्रमाणे सर्व नियोजन पहायचे, स्वतः काम करायचे आणि सगळ्यात महत्वाचे भरपूर माणसे जमावायचे. माझ्या आयुष्यात अधिकभाऊ हे १०० कार्यकर्त्यां एवढे होते. अधिकभाऊ असल्यावर माझे निम्यापेक्षा जास्त काम करायचे. अधिकभाऊ हे निस्वार्थी, आस्तिक आणि दृढ आत्मविश्वासी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या सहवासात मला माणसे समजू लागली आणि मी घडत राहिलो. माझे नशीब खराब आहे का, देवाला माझे चांगले बघवत नाही काय? असे मला कायम वाटते कारण आजकाल चांगली माणसे मिळणे खूप कठीण आहे. आणि अधिकभाऊंसारखी उत्तम माणसे मिळणे म्हणजे हिमालयातून सोने काढून आणणे एवढे कठीण आहे. ज्या-ज्या वेळी मी पुढे जाऊ लागलो, त्यावेळी अशी अधिकभाऊंसारखी माणसे काळाच्या पडद्याआड निघून गेली आणि मी पुन्हा एकटा पडू लागलो. निष्क्रिय होऊ लागलो. पण अश्यावेळी माझ्या अंतर मनातील अधिकभाऊ जिवंत होते. मला जागे करत होते. मला प्रेरणा देत होते. 
         
        आणि म्हणूनच त्यांचा वैचारिक वारसा जपावा त्यांचं जीवनाचं लोकांना वैचारिक, अध्यात्मिक सक्षम बनविण्याचा उद्दीष्ठ पूर्ण करण्याचा निर्णय मी घेतला. विजयादशमी दसरा दि.०३ ऑक्टोबर २०१४ ला शिवाजीनगर ता. कडेगांव येथे कै. अधिकभाऊ मांडवे सार्वजनिक वाचनालयाची सुरवात केली. काही लोक म्हणायचे वाचनालयाची काय गरज आहे. रस्ते, धरणे बांधा, नाले बांधा. तर काहि लोक म्हणायचे यातून आपला फायदा काय? मला लोकांची कीव यायची कारण प्रत्येक गोष्टीत फायदा असेल तरच केली पाहिजे ही वृत्ती निर्माण झाली आहे ही अतिशय भयावह गोष्ट आहे. आणि बाकीचे सर्व बदल, विकास केलाच पाहिजे पण जर मेंदूचं विकसित झाला नाही तर नाला आणि धरणाचा काय उपयोग. असे म्हणतात ' वाचाल तर वाचाल ', वाचनालयाची गरज का आहे याची काही उदाहरणे महापुरुषांच्या चरित्रातून सापडतात. पैकी ज्यावेळी भगतसिंग यांना इंग्रजाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली सकाळी फाशी देणार तर आदल्या रात्री भगतसिंग हे एक पुस्तक वाचत होते त्या वेळी तेथील जेलरने भगतसिंग यांना विचारले की “तुला तर उदया फाशी देण्यात येणार आहे ; मग हया पुस्तक  वाचण्याचा काही उपयोग होणार नाही !! त्या वेळी भगतसिंग जेलरला म्हणाले की “माझ्या  वाचनातून अनेक भगतसिंग जन्माला येतील . भगतसिंग यांनी तुरूंगात असताना पुस्तक वाचावयास मिळावे यासाठी अन्नत्याग करून उपोषण केले होते. 
            
         त्याचबरोबर बाबासाहेबांनी पुस्तकासाठी राजगृह नावाचे एक घर, एक वाचनालयच बांधले होते, ज्यात हजारो पुस्तक होती. पुस्तके आणि वाचनालय याप्रति बाबासाहेबांची अतिशय श्रद्धा होती. मला काहीही करा पण माझ्या पुस्तकांना काही इजा केलीत तर मी तुम्हाला सोडणार नाही. एवढी लगन या महापुरुषाची पुस्तके आणि वाचनालय याबद्दल होती. म्हणून वाचनालय हे वैचारिक क्रांती आणि मानसिक विकासाचे ठिकाण आहे ते गावागावात असले पाहिजे असे माझे मत आहे. असो प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. पण जे लोक वैचारिक पुढारलेले आहेत त्यांना या वाचनालयाची किंमत माहिती आहे.
अॅड. विकास मोहिते यांनी कै. अधिकभाऊ मांडवे वाचनालयास पुस्तके दिली.
त्यापैकी सुरवातीला गावातील सुजाण नागरिक यामध्ये प्रामुख्याने अॅड. विकास मोहिते यांनी काही पुस्तके वाचनालायास दिली. त्याचबरोबर काही लोकांनी आर्थिक मदत देखील केली. तरुण सहकाऱ्यांनी सर्व सेट करण्याचे कार्य अगदी हिरिरीने केले. तदनंतर कृषी विभाग, आत्मा आणि अनुलोम अश्या विविध संस्थांकडून पुस्तके मिळाली. 
 वाचनालय सुरू झालं. वाचक येऊ लागले. तरुणांना वाचनाची आवड निर्माण झाली. पण आर्थिक अडचणी संपत नव्हत्या. मग आम्ही अर्थार्जनासाठी ग्राहक सुविधा केंद्र सुरू केले. तालुक्याच्या ठिकाणी मिळणाऱ्या ऑनलाईन सुविधा गावातच मिळू लागल्या. लोकांची सोय झाली त्यामुळे लोकसुद्धा समाधानी होते. 

      कै. अधिकभाऊ मांडवे वाचनालयाच्या माध्यमातून सुसंस्कृत, चारित्र्यवान युवा पिढी निर्माण करण्याचे कार्य आम्ही हाती घेतले आहे. विविध जयंती-उत्सव आदींच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणे हे आमचे उद्दीष्ठ आहे. कै. अधिकभाऊ मांडवे वाचनालयाच्या माध्यमातून विविध स्पर्धा ज्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या माध्यमातून युवक विकास आणि सामाजिक नेतृत्व तयार करण्याचे ध्येयासाठी आम्ही झटत आहे. अजून आमच्या आर्थिक गरजा संपूर्ण पूर्ण होत नाहीत. आधुनिकीकारणासाठी आम्हाला निधीची गरज आहे. पण काही टेन्शन नाही. ज्याचे उद्दीष्ठ साफ असते त्याला प्रत्यक्ष देव मदत करतो असे माझे मत आहे. आणि खरोखर आमचे मागणे देव ऐकत आहे. ज्याची समाजाबरोबर नाळ जोडलेली असते तो कधीही समाजाला एकट पडू देत नाही. वाऱ्यावर सोडत नाही. समाज स्वतः पुढे येऊन आम्हाला मदत करत आहे. वाचन चळवळीस पुढे नेण्यासाठी हे सुखद आणि आशादायी पाऊल आहे. 

अनुलोम संस्थेकडून कै. अधिकभाऊ मांडवे वाचनालयास पुस्तके प्रदान.

                           
विद्यां ददाति विनयं विनयाद् याति पात्रताम् ।
पात्रत्वात् धनमाप्नोति धनात् धर्मं ततः सुखम्॥ 

    या महाभारतातील श्लोकाचा अर्थ असा आहे. विद्या विनय देते; विनयामुळे पात्रता येते, पात्रतेमुळे धन, धनापासून धर्म, आणि धर्मापासून सुख प्राप्त होते. शिवशक्ती सोशल फौंडेशन संचलित कै. अधिकभाऊ मांडवे वाचनालय या श्लोकातील अर्थ आणि विचार सत्य ठरविते. आजपर्यंत १००० पेक्षा जास्त लोकांनी कै. अधिकभाऊ मांडवे वाचनालयास भेट दिली आहे. आपण आमच्या वाचनालायस भेट दिली किंवा कोणताही नवीन व्यक्ती आमच्या वाचनालयात आला की, त्या व्यक्तींचा सन्मान करणे हा आमचा ‘ अतिथी देवो भव ’ हा धर्म आहे . या सर्वांचा सन्मान आम्ही नारळ किंवा फेटा वगैरे देऊन करत नाही, तर आम्ही भेटरूपी पुस्तक देतो कारण आमचा असा विचार आहे की, विचार वाटा. कारण पुस्तकाने अशक्त मस्तक सशक्त होते व सशक्त मस्तक कोणासमोर नतमस्तक होत नाही.
           
           एवढं सगळं करत असताना, नवनिर्माण होत असताना निंदक पण खूप निर्माण झाले. वाचनालय चार दिवसात बंद पडेल अशी वलग्ना करू लागले पण कै. अधिकभाऊ मांडवे सार्वजनिक वाचनालय गेली ४ वर्षे अविरत वाचकांची वाचनाची भूक भागवत आहे. ४ दिवसाचे वाचनालयाला आज चार वर्षे झाली. अजून पुढची ४०० वर्षे वाचनालय बंद पडणार नाही तर विचारांच्या प्रसारातून क्रांतिकारक निर्माण करीत राहील. अध्यात्म आणि सात्विक ज्ञानाचा प्रसार प्रचार करीत राहील याची तरतूद आम्ही केली आहे. आम्ही संपेन, आमचे नाव संपेल पण कै. अधिकभाऊ मांडवे वाचनालय व कै. अधिकभाऊ यांचे विचार कधीच संपणार नाहीत.
                                                                             
                                                               आपलाच,
      प्रमोद महादेव मांडवे
        संस्थापक/ अध्यक्ष, शिवशक्ती समूह


कै. अधिकभाऊ मांडवे यांच्या स्मरणार्थ शिवशक्ती 'कै. अधिकभाऊ  मांडवे वाचनालयाकडून भजनी साहित्य वाटप.







Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Comments

Buy Now