मा. गणेश मांडवे खजिनदार, शिवशक्ती समूह |
बदनामीचे षड्यंत्र : न भीतो मरणादस्मि केवलम दूषितो यशः
मी गणेश मांडवे आजकाल माझ्यावर झालेल्या हल्यावरून लक्ष विचलित व्हावे, या हेतूने माझी प्रतिमा कलंकित करण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत आहेत. असो लोक फक्त फळे असणाऱ्या झाडाळच दगडे मारतात. काट्याच्या झाडाला कोणीही दगडे मारत नाही. पण ठीक आहे, दगडे मारणाऱ्याला काहिनाकाही फळ मिळत आहे. त्यामुळे त्याचा आत्मा सुखी होतोय यातच मला आनंद मिळतोय. जग सुखी तर आपण सुखी हे माझे तत्व आहे. आणि आजकाल स्वतःला वाघ, सिंह उपाध्या स्वतःच देने हा प्रकार खूप वाढलाय, काही लोकांना त्यात आनंद मिळतोय. पण वाघ, सिंह कधी टोळीने शिकार करीत नाहीत. टोळीने शिकार करतात त्यांना डुक्कर म्हणतात. वाघ एकटाच शिकार करतो. पण शिकार करायला मी कोणी वाघ, सिंह नाही. मी एक सामान्य माणूस आहे. ज्याचा आपल्या समाजव्यवस्थेवर आणि संविधान, न्यायपालिकेवर दृढ विश्वास आहे.
आचार्य चाणक्य म्हणतात, जेंव्हा तुम्ही काहीतरी चांगलं करण्याचा उद्देश ठेवून मार्गक्रमण करता, त्यावेळी सर्वप्रथम काही हितचिंतक तुमची निंदानालस्ती करतात. त्यातूनही तुम्ही पुढे मार्गक्रमण केले की, मग तुम्हाला थांबविण्यासाठी कट रचले जातात. तुमचा रास्ता अडवला जातो. तरीही तुम्ही पुढे कूच केली की मग मात्र अश्या हितचिंतकांचे संयम तुटतात आणि ते तुमच्या प्राणाचे असुसलेले होतात. तुम्हाला, तुमच्या कार्याला कलंकीत करण्याचा प्रयत्न करतात. अश्यावेळी तुमच्याकडे संयम हवा. तोच संयम मी पाळतो आहे.
आणि आरोप श्रीराम, सीतामाई, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर देखील झाले. यासाठी त्यांना खूप दुःख, बदनामीला सामोरे जावे लागले. कठीण परीक्षा द्याव्या लागल्या. पण सत्य हेच शिव आहे. सत्य कधीच लपत नाही. ते समोर येतेच. मीही अश्याच शारीरिक, मानसिक यातना समाजहितासाठी भोगत आहे.आणि मरेपर्यंत भोगेन. मी मनुष्य आहे अविचारी श्वापद अथवा प्राणी न्हवे. माझ्या रक्तात छत्रपतींचे आचार-विचार आहेत. स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे की, सत्याच्या शोधात, समाजहितासाठी शंभर वेळा पडला तरी पुन्हा एकदा उठून सज्ज व्हा. मी एक हजार वेळा पडलो तरी पुन्हा उठेन आणि सत्यासाठी बंड करेन. सत्य आणि समाजसेवा हाच माझा धर्म आहे.
आपलाच,
गणेश महादेव मांडवे
खजिनदार, शिवशक्ती समूह
#IsupportGm
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
|
|
|
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा. |
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा. |
Comments
Post a Comment
Comment and share this article.